Imd warns Heavy Rainfall in Maharashtra Many District Mumbai Pune Nashik Kokan Weather Updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: लक्ष्मीपूजनानंतर राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार; IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

IMD Rain Alert: अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Updates Latest News

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील कोसळत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात आली असून ऐन दिवाळीत बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार (Heavy Rain), असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.

या पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचं नुकसान झालं. कोकणात भातशेतीचं नुकसान झालं. विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेली हरबरा तसेच सोयाबीन पिके पाण्यात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, हवामान खात्याने देशासह राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गोवा, केरळ, तामिळनाडूसह राजधानी दिल्लीमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात येत्या २४ तासांत अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी हवेतील आद्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे त्यामुळे येत्या २४ तासांत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस (Rain Alert) पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT