Maharashtra Rain Alert  Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा धो-धो, 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 4 दिवस कुठे कसा असेल पाऊस? जाणून घ्या...

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा धो-धो, 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 4 दिवस कुठे कसा असेल पाऊस? जाणून घ्या...

Satish Kengar

Maharashtra Rain Alert :

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे आतापासूनच काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसत आहे. यातच काहीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्यातील विविध भागात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीतील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने या महिन्यात 24, 25, 26, 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातच रविवार आणि समोवारीही काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facebook मध्ये होणार मोठा बदल! App उघडताच दिसणार रिल्स व्हिडिओ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी खासदारांसह जंतरमंतरकडे निघाले

Rajpal Yadav : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांसमोर भावूक झाला राजपाल यादव, आता काय म्हणाला?

Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

Car on 20000 salary: दरमहा 20 हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घेण्याचा विचार कराल?

SCROLL FOR NEXT