IMD Rain Alert Saam Digital
महाराष्ट्र

IMD Rain Alert : पुढचे ३ तास पश्चिम महाराष्ट्र, कोकणात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Rain Alert West Maharashtra, Konkan: पुढचे तीन तास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Sandeep Gawade

गेल्या आठवडाभर वादळीवारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्याला झोडपून काढलं आहे. विदर्भ-मराठवाड्यात तर नदीनाले तुडुंब भरुन वाहत होत. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मराठवाड्यात पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचं सावट आहे. त्यात आज अचनाक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर ढग दाटून आले असून पुढचे तीन तास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. येत्या ३ दिवसात मराठवाड्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमान ४३ अंशांपर्यंच पोहोचलं आहे. उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, असा सल्ला देण्यात आलाय. हवामान खात्याने  पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, धुळे, जळगाव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच, शेतपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. आता पुन्हा हवामान विभागाने इशारा दिल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT