IMD prediction of heavy rains in Maharashtra in the next 3 days Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'या' राज्यांना अलर्ट

Rain Alert in Maharashtra: येत्या २ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव कमी होऊन राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Satish Daud

IMD Rain Alert in Maharashtra

मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसून येतोय. कधी कडाक्याची थंडी, तर कधी ढगाळ वातावरण तयार होतंय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मागील दोन दिवसांपासून देशात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, आता अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार होतंय. अशातच हवामान खात्याने काही राज्यांना पुन्हा पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत देशातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश अरुणाचल आणि केरळसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे. ३१ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.

महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील अहमदनगर, पुणे, जळगाव, महाबळेश्वर कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

भल्यापहाटे धुक्यासह थंडीचा कडाका जाणवत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मात्र, येत्या २ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव कमी होऊन राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT