India Meteorological Department (IMD) predicts early monsoon in 2025 with Kerala receiving rains by June 1 and Mumbai by June 7–8. Above-normal rainfall expected across several regions due to La Niña. 
महाराष्ट्र

Monsoon : आनंदवार्ता! २ आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये धडकणार, मुंबईत कधी कोसळणार पाऊस?

Mumbai rain date June 2025 : हवामान खात्याचा अंदाज - यंदा मान्सून केरळमध्ये १ जूनला आणि मुंबईत ८ जूनपर्यंत धडकण्याची शक्यता. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज.

Namdeo Kumbhar

Maharashtra, Mumbai monsoon arrival 2025 : कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी अंदमान- निकोबार बेटांवरून आनंदाची बातमी आली आहे. यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल होणार आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये एक जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळण्याची शक्यता आहे.

यंदा देशात १०५ % पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलाय. केरळमध्ये मान्सून एक जून २०२५ रोजी दाखल होईल, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात ८ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस धडकणार आहे. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे सांगण्यात येतेय.

IMD नुसार, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात १९ किंवा २० मे रोजी मान्सूनपूर्व वातावरण तयार होईल. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर लवकर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येणार आहे. यंदा कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस अपेक्षित आहे.

मुंबईत लवकर धडकणार मान्सून?

उत्तर गोलार्धातील यंदा कमी हिमवृष्टी आणि न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल (IOD) यामुळेही मान्सूनला पोषक वातावरण आहे. मुंबईत मान्सूनचा पाऊस साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. यंदा हवामान विभागाने 7 ते 8 जूनच्या दरम्यान मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जास्त पावसामुळे खरीप पिकांना फायदा होईल, तसेच धरणे आणि जलाशयांची पाणीसाठवणूक वाढण्याची आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT