IMD Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain Alert: पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

Heavy Rain Alert in Maharashtra

एकीकडे देशभरात थंडीचा कडाका वाढलेल्या असताना दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या डोंगराळ भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हवेत मोठा गारवा निर्माण जाला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसच्या खाली आलं आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. (Latest Marathi News)

मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, एकीकडे नागरिकांना हुडहुडी जाणवत असताना दुसरीकडे हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.

पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषण वातावरण निर्माण झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आयएमडीचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी सकाळी दिल्ली नोएडा, गाझियाबाद आणि इतर भागात हलका पाऊस झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT