Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. मुंबईसह अनेक ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. IMD नुसार जानेवारी ते मार्चदरम्यान देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात थंडी सुरू असतानाच मुंबईसह अनेक भागात रिमझिम पाऊस

  • जानेवारी ते मार्चमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

  • जानेवारीत कमाल-किमान तापमान सरासरीपेक्षा कमी, गारठा कायम

  • मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, यूपी, बिहारमध्ये दीर्घ थंडीचा इशारा

राज्यात थंडीचे वातावरण सुरु असताना पावसाने देखील हजेरी लावली आहे. मुंबईसह अनेक भागात रिमझिम सरी कोसळल्या. आज देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्यात देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भासह, अनेक जिल्ह्यांत थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा, तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि कमाल व किमान तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी गुरूवारी जाहीर केला. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच किमान तापमानात घट झाल्याने राज्यात गारठा वाढला.

डिसेंबर महिन्यातदेखील तीव्र थंडी अनुभवायला मिळाली. सध्या राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, गारठा काहीसा कमी झाला आहे. जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत कमी किमान तापमान राहणार असल्याने थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

IMD नुसार पुढील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जानेवारीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान ऐन थंडीच्या काळात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसल्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT