kajli river, ratnagiri , sindhudurg, rain update, rain, red alert saam tv
महाराष्ट्र

Red Alert : रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार, रघुवीर, करूळ घाटात दरड कोसळली; ४८ तास पुणे, मुंबईसह रत्नागिरीस रेड अलर्ट

राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमाेल कलये, विनायक वंजारे

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Rain) दाेन दिवस राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील सतत पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान हवामान विभागानं मुंबई, पुणेसह रत्नागिरी जिल्ह्यांना पुढील ४८ तास रेड अलर्टचा (Red Alert) इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Rain Update)

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील शेती परिसर आणि सखल भागातील अनेक ठिकाणांना बसला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात (182 मिली मीटर) दमदार पाऊस झाला आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, गुहागर या तालुक्यांमध्ये शंभर मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चाेवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

याबराेबरच रघुवीर घाटामध्ये दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली. पावसाळी वातावरणामुळे दरड हटवण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे असे प्रशासनाने कळविले आहे. तसेच काजळी नदीने धाेक्याची पातळी ओलांडली आहे.

करूळ घाटात दरड काेसळली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका करूळ घाटाला बसला. या घाटातील संरक्षक भिंत कोसळून घाटमार्ग बंद झाला आहे. गेल्या चाेवीस तासात वैभववाडीत (127 मिली मीटर) पाऊस पडला. या पावसाचा फटका तळकोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या महत्वाच्या करूळ घाटाला बसला. रात्री दहाच्या सुमारास घाटातील संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फोंडाघाट व आंबोली मार्गे या मार्गावरची वाहतूक सध्या वळविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT