Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : पावसाचा मुक्काम आणखी वाढला,नोव्हेंबर महिन्यातही धो धो कोसळणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update : मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्याने राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही हवामान विभागानुसार ५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात रिमझिम सरींचा अंदाज असून तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्याने राज्यात पावसाचा जोर कमी झाला.

मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामानासह रिमझिम सरींचा अनुभव

राज्यभर तापमानात घट

सोलापूर ३२.६ अंश तर महाबळेश्वर १४.४ अंशावर

हवामान खात्यानुसार ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरी पडण्याची शक्यता कायम

राज्यावरचं मोंथाच संकट टळल्याने पावसाचा जोरही कमी झाला आहे. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. तसेच आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी येत्या ५ नोव्हेंबर पर्यंत पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

समुद्रात गेले एक आठवडा धुमाकूळ घालणार मोंथा चक्रीवादळ काही प्रमाणात शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच दोन्ही समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली. धुळे येथे आणि नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीने राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे.‎

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानातही हळूहळू घट होत असून, पहाटे थंड वारे अनुभवायला मिळत आहेत. सोलापूर येथे ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची, महाबळेश्वर येथे १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

आज मुंबई आणि उपनगरासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन पावसाचा लपंडाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हाता-पायांवर ही लक्षणं दिसली तर हार्ट अटॅक येऊ शकतो; उशीर करणं पडेल महागात

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये तब्बल 80 जणांची बंडखोरी

Yellow Batata Bhaji Recipe: मुलांच्या टिफीनसाठी सुकी बटाटा भाजी कशी बनवायची?

९० दिवस काम करा अन् पेन्शन मिळवा; गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारासांठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shocking : खांबावर चढून विजेच्या वायरला पकडलं, क्षणात तरुणाचा कोळसा झाला; मध्य प्रदेशच्या कामगाराची नांदेडमध्ये आत्महत्या

SCROLL FOR NEXT