Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Winter Update : हुडहुडी वाढली! तापमान २ ते ८ अंशांनी घसरलं, मुंबई पुण्यासह राज्यात गुलाबी थंडी

Maharashtra Weather Update : उत्तरीय वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्यभर थंडीचा कडाका वाढला आहे. जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, मुंबईत किमान तापमानात घट नोंदली गेली असून पुढील काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Alisha Khedekar

उत्तरीय वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला

धुळे येथे हंगामातील नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद

जळगावात सलग तिसऱ्या दिवशी तापमान घसरले

IMD नुसार पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहणार

उत्तरीय वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. बहुतांशी भागात किमान तापमानातील घट आजही कायम राहणार आहे. राज्यात किमान तापमान २ ते ८ अंशाने घसरलं आहे, तसेच कमाल तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण थंड राहणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, बीड इत्यादी शहरांमध्ये गुलाबी थंडीची चादर पसरली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. किमान तापमानात घेत झाल्याने आणि कमाल तापमानात चढउतार असल्याने वातावरण थंड राहणार आहे. पहाटे थंडीचा कडाका वाढला असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा उकाडा कायम आहे. त्यामुळे सकाळी गारठा तर दुपारी उकाडा अशी परस्परविरोधी स्थिती पाहायला मिळत आहे.

काल म्हणजेच बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎सोलापूर येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. धुळे येथे राज्याचे हंगामातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. निफाडमध्ये पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे. तर जळगाव येथे ९.१ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीची लाट कायम आहे. ‎‎नाशिक, जेऊर, मालेगाव, परभणी कृषी विद्यापीठ, गोंदिया, ‎यवतमाळ येथे पारा ११ अंशांच्या खाली असल्याने गारठा वाढला आहे.

जळगावात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरला

जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरला आहे. बुधवारी किमान तापमान ९.१ डिग्री सेल्सिअसवर होते. जळगाव जिल्हा कोरड्या हवेच्या क्षेत्रात येतो. सध्या कोरड्या हवेचा दबाव जास्त आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणारी ओलसर हवा ते रोखत आहेत व या कारणामुळे जिल्ह्यात सध्या सापेक्ष आर्द्रता कमी आहे.त्यामुळे थंडी वाढण्यास मदत होते. कोरडी हवा रात्रीच्या वेळी जलद गतीने थंड होते ज्यामुळे तापमानात घट होते आणि थंडी वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT