Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update : समुद्रात कमी दाब निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता घटणार असून थंडीची चाहूल लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Alisha Khedekar

समुद्रात कमी दाबामुळे पावसाची तीव्रता घटण्याची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस

तापमान घटून राज्यात थंडगार हवा सुरू होणार

हवामान विभागानुसार येत्या काही दिवसांत थंडीची चाहूल लागेल

समुद्रात कमी दाब निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. काल मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली. आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल आणि किमान तापमानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्रात काल २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील लांजा येथे प्रत्येकी १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्गातील दोडामार्ग, सावंतवाडी येथे ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत असून, तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली असून, पहाटे थंडगार वारा अनुभवायला मिळत आहे.

राज्यात आज मुंबई, ठाणे, पालघर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

येत्या ५ तारखेपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमी होणार असून थंडीची चाहूल लागणार आहे. यावर्षी थंडी तीव्र नसून माध्यम स्वरूपाची असल्याचंही हवामान विभागाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT