Maharashtra Weather  Saam Tv
महाराष्ट्र

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Alert : राज्यातील थंडीचा जोर कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात वाढ होत आहे

  • काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे

  • अनेक शहरांमध्ये पारा ३० अंशांच्या पुढे

  • हवामानातील बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची, तसेच गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

काल २२ नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ८.५ अंश तापमान नोंदले गेले. जळगाव आणि परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात पारा ११ अंशांच्या खाली असल्याने गारठा कायम होता. उर्वरित राज्यात थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला असून, उकाडा जाणवू लागला आहे.

अनेक ठिकाणी तापमानाचा पारा तिशीपार आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील डहाणू येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.उत्तरेकडून येणार शीत वारे मंदावले असल्याने राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाली आहे. राज्यावर थंडीची गुलाबी चादर पसरलेली असताना वातावरणात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक काही ठिकाणी पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळणार आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आजारांना आमंत्रण मिळत आहे. सर्दी, खोकल्यासारख्या आजारांनी मान वर काढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बापाची हत्या केली अन् मृतदेह घरातच पुरला, दुर्गंधीनंतर लेकाचं बिंग फुटलं, संभाजीनगर हादरलं

Sunday special horoscope: आजचा दिवस नशीब उजळणारा! या राशींना मिळणार कामात प्रगती आणि आर्थिक लाभ

Pune News: प्रामाणिक अंजूताई! मालकाचा शोध घेत परत केली सापडलेली 10 लाख रुपयांची बॅग

Maharashtra Politics: साताऱ्यात एकनाथ शिंदेंना धक्का, लाडक्या बहिणीनं सोडली साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणार, अजित पवारांनी दिले संकेत, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT