उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
धुळे ६.२°, परभणी व जेऊर ८°—अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांच्या खाली
पुण्यात गुलाबी थंडीत नागरिकांची व्यायामाला पसंती
राज्यात दव, धुके आणि किमान तापमानात मोठी घट
उत्तरेकडील शीत वारे हळूहळू महाराष्ट्राकडे सरकत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राला अक्षरशः गारठून टाकले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ८ अंशांची मोठी घट नोंदवली गेली आहे. आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढत असल्याने अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरला आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत असून निवडक ठिकाणी पारा अद्यापही ३० डिग्री सेल्सियस पार आहे. पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकून राहत असून, धुके आणि दव पडल्याची चित्र कायम आहे. काल सकाळपर्यंत २४ तासांमध्ये डहाणू आणि रत्नागिरी येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
काल धुळे येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.२ अंश तापमान नोंदले गेले. तर जेऊर आणि परभणी येथे ८ अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि ८.३ अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, यवतमाळ येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून थंडीची लाट आहे. पुणे, महाबळेश्वर, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशीम येथे पारा ११ अंशांच्या खाली असल्याने गारठा वाढला आहे.
सध्या पुण्यात गुलाबी थंडी पसरलीय आणि या थंडीचा नागरिक आनंद घेताना दिसतात. सकाळच्या सत्रामध्ये पारा अधिक खाली येत असल्याने या गुलाबी थंडीत पुणेकर मोठ्या प्रमाणात व्यायामाला पसंती देत असल्याचे दिसून येतंय. थंडीच्या काळात व्यायाम करणे म्हणजे उत्तम आरोग्यासाठी लाभदायक असते. याच निमित्ताने पुण्यातील सारसबागेत उत्कर्ष ग्रुपकडून दररोज पहाटे पासून याठिकाणी व्यायामशाळा भरवली जाते. विशेष म्हणजे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सहभाग असतो तेही निःशुल्क. मागील आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीने गारठू लागले आहेत. शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत आहे असं असलं तरीसुद्धा सारसबागेतील ही गँग मात्र व्यायामात घामाघूम होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.