Maharashtra Winter Temprature Update Saam tv
महाराष्ट्र

Today Weather : राज्यात थंडीचा कहर! जेऊरचा पारा ६ अंशांवर, मध्य महाराष्ट्रात ‘येलो अलर्ट’, आज कसं असेल हवामान? वाचा

Maharashtra Winter Temprature Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जेऊरसह अनेक शहरांत तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला

  • जेऊरमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद

  • मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट

  • पुढील काही दिवस हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

उत्तरेकडील शीत लहरी वेगाने वाहत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरात थंडीचा कडाका वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत.

काल म्हणजेच शनिवारी जेऊर येथे राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ६.१ अंश, निफाड येथे ६.३ अंश, परभणी येथे ६.९ अंश, जळगाव येथे ७ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर येथे ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी, तर पुणे, नाशिक, मालेगाव येथे ९ अंशांपेक्षा कमी, ‎सातारा, गोंदिया आणि भंडारा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. शनिवारी (ता. १३) जेऊर, धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर, परभणी येथे थंडीची लाट होती. आज नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. शिवाय उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तापमान कसे असणार ?

  • पुणे :- ८.८ अंश सेल्सियस

  • अहिल्यानगर :- ७.५ अंश सेल्सियस

  • धुळे :- ६.१ अंश सेल्सियस

  • जळगाव :- ७.० अंश सेल्सियस

  • जेऊर :- ६.० अंश सेल्सियस

  • ‎‎कोल्हापूर :- १४.० अंश सेल्सियस

  • ‎महाबळेश्वर :- १२.९ अंश सेल्सियस

  • मालेगाव :- ८.६ अंश सेल्सियस

  • ‎‎नाशिक :- ८.६ अंश सेल्सियस

  • निफाड :- ६.३ अंश सेल्सियस

  • ‎‎सांगली :- ११.७ अंश सेल्सियस

  • ‎सातारा :- ९.५ अंश सेल्सियस

  • ‎सोलापूर : - १२.६ अंश सेल्सियस

  • ‎सांताक्रूझ :- १६.६ अंश सेल्सियस

  • डहाणू :- १५.३ अंश सेल्सियस

  • ‎रत्नागिरी :- १७.१ अंश सेल्सियस

  • ‎छत्रपती संभाजीनगर :- ११.२ अंश सेल्सियस

  • ‎धाराशिव :- १०.२ अंश सेल्सियस

  • परभणी :- ६.९ अंश सेल्सियस

  • ‎‎अकोला :- ११.७ अंश सेल्सियस

  • अमरावती :- १०.९ अंश सेल्सियस

  • भंडारा :- १०.० अंश सेल्सियस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात दुचाकीस्वाराची हुल्लडबाजी, स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mobile Battery Low: मोबाईलची बॅटरी अचानक कमी होतेय? तर 'या' ४ सेटींग्स आत्ताच बंद करा

Kurkure Bhel Recipe: चटपटीत कुरकुरे भेळ कशी बनवायची?

Stress Effect: जास्त स्ट्रेसमुळे शरीरात होऊ शकतात हे बदल, वेळीच व्हा सावध

मोठी बातमी! भाजपने भाकरी फिरवली; राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बड्या नेत्याची नियुक्ती

SCROLL FOR NEXT