Today Weather News  Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये 'उन्हाळ्यात पावसाळा'; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

Today Weather News : महाराष्ट्रात तापमान वाढत असून काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात तापमान वाढ आणि ढगाळ वातावरण

  • दक्षिण तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

  • मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

  • उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज

मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. हळूहळू थंडी ओसरून वातावरण उष्ण होऊ लागलं आहे. तसेच हवामान विभागाने कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात उन्हाचा कडाका हळूहळू तीव्र होत आहे. आज राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. जेऊर येथे राज्यातील नीचांका तापमानाची नोंद झाली. जेऊर येथे 14.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच हवामान विभागागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ हवामानासह हलक्याते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारी आणि २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश येथे २२ आणि २४ फेब्रुवारी रोजी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT