Nashik Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: नाशकात अवैध शस्त्रसाठा जप्त, तिघांना अटक

नाशकातील सुरगाण्यात अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : नाशकातील सुरगाण्यात अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीये. यामध्ये देशी बनावटीचे 3 देशी पिस्तुल, 06 जिवंत काडतुसे आणि एअरगनसह चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे (Illegal weapons seized in Surgana Nashik three arrested).

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाण्यातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रसाठा (Illegal Weapon) जप्त केलाय. सुरगाणा (Surgana) तालुक्यातील चिराई घाटमाथ्याजवळील नागशेवडी परिसरात पोलिसांनी (Police) ही धडक कारवाई केली. नागशेवडी शिवारात काही तरुणांकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात भल्या पहाटे छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचे 3 देशी पिस्तुल, 06 जिवंत काडतुसे, एका एअरगनसह चॉपर आणि कोयते हस्तगत केलेत. यामुळे या परिसरात खळबळ उडालीये. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 3 तरुणांना अटक (Arrest) केली असून पोलीस अधिक तपास करतायत. मात्र, सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात अवैध शस्त्र आढळून आल्यानं अवैध शस्त्रास्त्रांची पाळंमुळं ग्रामीण भागात पसरल्याचं समोर आलंय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT