Police officials during the raid at a hotel in Shirdi where an illegal sex racket was exposed. Saam Tv
महाराष्ट्र

श्रद्धेच्या भूमीत काळा धंदा; शिर्डीतील हॉटेलमधील देहविक्री प्रकरणाने खळबळ, नेमकं काय घडलं?

Sex Racket Busted In Shirdi Hotel: शिर्डी शहरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल मालकासह दोन जणांना अटक केली आहे.

Omkar Sonawane

शिर्डीतील हॉटेल पवनधाममध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांच्या छाप्यात चार पीडित महिलांची सुखरूप सुटका

हॉटेल मालकासह दोन आरोपी अटकेत

साईनगरीच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह, नागरिकांमध्ये चिंता

पोलीस पुढील तपास करत आहेत

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर: शिर्डी शहरात अवैध वेश्या व्यवसायाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील हॉटेल पवनधाम येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून हॉटेलचा मालक आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. छाप्यात हॉटेलमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी हॉटेल मालक गोविंद गरूड आणि लता चव्हाण यांच्याविरोधात अनैतिक देहविक्रय प्रतिबंधक कायदा तसेच बाल लैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

खरे तर शिर्डी ही साईनगरी म्हणून देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी लाखो भक्तगण श्रद्धा आणि भक्तिभावाने साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. शांतता, भक्ती आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेली ही भूमी भाविकांसाठी श्रद्धेचं प्रमुख केंद्र ठरली आहे. म्हणूनच शिर्डीची ओळख केवळ पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर एक पवित्र आणि अध्यात्मिक भूमी म्हणून संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. मात्र अशा पावन ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra News Live Update: सांगलीत मुसळधार पावसाचा कहर; हरिपूर येथे वारणा नदी पात्राबाहेर, शेती पाण्याखाली

Raigad Flood: अंबा नदीच्या पुरात अडकलेल्यांची सुटका; 28 जणांचं थरारक रेस्क्यू, व्हिडिओ व्हायरल

₹200 मध्ये Airtel ची मोठी धमाल! JioHotstar सह 18+ OTT अॅप्स फ्री

Morning Water Benefits: सकाळी उठल्या उठल्या पाणी पिताय? शरीरावर काय होतो परिणाम; वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT