महिलाच चालवत होत्या घरात अवैध दारू भट्टी!लाखोंचा माल जप्त अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

महिलाच चालवत होत्या घरात अवैध दारू भट्टी!लाखोंचा माल जप्त

अबब महिलाच चालवत होत्या घरात अवैध दारू भट्टी !! गोदिया जिल्ह्यातील तिरोडा शहर परिसरात संत रविदास वॉर्डात सुरु असलेल्या दोन अवैध अड्ड्यांवर तिरोडा पोलिसांनी छापा मारला.

अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोदिया Gondia जिल्ह्यातील तिरोडा शहर परिसरात संत रविदास वॉर्डात सुरु असलेल्या दोन अवैध अड्ड्यांवर तिरोडा पोलिसांनी Police छापा मारला. या छापेमारीत तब्बल 2 लाख 36 हजार रूपयांचा सडवा मोहापास रसायन जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन महिलांच प्रमुख आरोपी असल्याची माहिती समोर आली. ह्या दोन्ही महिला आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

तिरोडा शहर पोलिस बिट परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना दरम्यान संत रविदास वॉर्डातील दोन ठिकाणी ही महिला आपल्या घरी हातभट्टी बाळगून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दोन पंचासमक्ष ह्या दोन महिला यांचा राहत्या घरी छापा मारला.

दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष घरझळती घेतली असता 2,980 किलो सडवा मोहपास रसायन अवैधरित्या आढळून आला. हा माल जप्त करत 2 लाख 36 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी ही दोन्ही महिला असल्याने कलम 41 (अ) अन्वये त्यांना नोटीस देऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

चिनी लोकांचे डोळे लहान का असतात? कारण एकालाही माहित नाही

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

SCROLL FOR NEXT