illegal construction demolished in amboli near sindhudurg
illegal construction demolished in amboli near sindhudurg saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg : आंबोली ग्रामस्थांच्या लढ्याला आलं यश, हिरण्यकेशी परिसरातील अनधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Amboli News :

आंबोली (amboli) हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतरित्या उभारलेले 27 बंगले वजा रिसाॅर्टवर प्रशासनाने पोलिस संरक्षणात तोडक कारवाई केली. गेले 20 दिवस सुरु असलेल्या ग्रामस्थांच्या लढ्याला अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झाल्याने यश आले आहे. ग्रामस्थांनी या कारवाईचे स्वागत आणि समाधान व्यक्त केले. (Maharashtra News

आंबोली येथील महाराष्ट्र सरकार व इतर हक्क वनखाते असलेल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमणे करून रिसॉर्ट उभे करून बेकायदेशीर 27 बंगले बांधले होते. हे बंगले अनधिकृत असल्याने ते तात्काळ पाडण्यात यावेत यासाठी येथील ग्रामस्थानी गेले 20 दिवसांपासून साखळी उपोषण छेडले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तातडीने अनधिकृत बांधकाम पाडावे अशी सूचना प्रशासनास देत ग्रामस्थांच्या आंदाेलनास पाठिंबा दिला हाेता.

अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले. हे अनधिकृत बंगले पोलिस संरक्षणात पाडण्यात आले. महसूल व वन विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT