Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

तसेच गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

विनोद जिरे

बीड - पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्याने रविवारी मृत्यू झाला होता. यात शवविच्छेदन अहवालावरून हा अवैध गर्भपात असल्याचे समोर आले होते. मंगळवारी सकाळी पोलिसांनी (Police) पतीसह नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी लगेच गेवराई येथील एका महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. बीड पोलीस (Beed Police) या महिला डॉक्टरला घेऊन बीडला येत आहेत.

सीताबाई उर्फ शीतल गाडे असे मयत महिलेचे नाव आहे. शीतल हा ऊसतोड मजूर असून, त्यांना अगोदरच 9, 6, आणि 3 वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. परंतु, रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हे देखील पाहा -

परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलीस ज्यांनी गर्भपात केला या ठिकणी पोहचले.

गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी दुपारी 2.30 वाजता ताब्यात घेतले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

SCROLL FOR NEXT