Sadabhau Khot On Tomato Price Saam Tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot On Tomato Price: 'परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका', सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

Sadabhau Khot Latest News: 'परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका', सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

Satish Kengar

Sadabhau Khot On Tomato Price: राज्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. हे फक्त २० किलो वजनाच्या एका क्रेटचे दर आहेत. यावरच आता क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका', असं ते म्हणले आहेत.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सदाभाऊ खोत म्हणाले आहेत की, ''ज्याला परवडत नसेल त्यांनी दोन, तीन महिने टोमॅटो खाऊ नका. टोमॅटो नाही खालं तर कोण मरत आहे का? नका खाऊ टोमॅटो.'' (Latest Marathi News)

ते म्हणले, ''टोमॅटोच्या महामारीमुळे सुद्धा रोज मरणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. यामुळे दवाखानेही भरलेले आहेत. सगळे डॉक्टरही चिठ्ठीवर टोमॅटो असं लिहून देत आहेत. कारण आता एकच औषध टोमॅटो आहे.''

दरम्यान, या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे टोमॅटोची लागवड कमी आहे. दरवर्षी या काळात मोठी आवक व्हायची. यंदा आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत. बाजारात मागील आठ ते दहा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे.

किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. तसेच उच्चतम प्रतिचा टोमॅटो प्रतिक्रेट ५५० रुपयांपर्यंत गुरुवारी विकल्या गेला. बाजारात सरासरी ४०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत टोमॅटोला दर मिळाले. येत्या काळात आवक वाढली तर दरांवर परिणामाची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT