Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: PM मोदींच्या जागी मी असतो तर मी देखील हेच केलं असतं; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

जर मी त्यांच्या जागी असतो तर मी देखील हेच केलं असतं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics: 'कोण संजय राऊत? मी ओळखत नाही', वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशात आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात आणखी एक वक्तव्य केलं आहे. ईडी आणि सिबिआयची सूत्र भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या हाती आहेत, असा आरोप नेहमीच विरोधकांकडून होताना दिसत आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी याला आपलं सहमत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी काही चुकीचं वागतात असं मुळीच वाटतं नाही. जर मी त्यांच्या जागी असतो तर मी देखील हेच केलं असतं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. (Latest Maharashtra Politics News)

काल माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत आहेत. त्यामुळे ईडी आणि आयकर विभाग यांचा ते गैरवापर करतात असं मला वाटत नाही. सत्ता राखण्यासाठी योग्या आणि आवश्यक सर्व गोष्टी ते करतात."

"मी जर नरेंद्र मोदी असतो म्हणजे त्यांच्या जागी असतो तर मी सुद्धा हेच केलं असतं. मोदींना त्यांची खुर्ची हवी आहे. या आधीच्या सरकारमध्ये देखील काही नेत्यांवर ईडीच्या कारवाई झाल्या आहेत. कोणतही सरकार आपली सत्ता राखण्यासाठी हेच करतं. याचं सर्व गोष्टी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मला कोणीही अडवू शकत नाही

जर उद्या मला भाजपसोबत जाण्याचा मोह झाला तर मला कोणीही अडवू शकत नाही. माझा पक्ष आणि कुटुंबीय यांच्या व्यतिरिक्त मला कोणीही अडवू शकत नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सत्तासंघर्षानंतर भाजप आणि विरोधकांमध्ये सातत्याने खडाजंगी पहायला मिळत आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांना आता पर्यंत ईडी आणि सीबीआयच्या नोटीस बजावण्यात आल्यात. काहींना कारवाईला देखील सामोरं जावं लागलं आहे. अशात या सर्व तपास यंत्रणांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून होत आहे,असा आरोप सातत्याने होताना दिसतो.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी यावर आपलं व्यक्त केलेलं मत ऐकून ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

Jalgaon News : गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट; ४ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT