Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'उमेदवारी न दिल्यास...' आष्टीच्या माजी आमदाराने बंडाचे निशाण फडकवले, महायुतीला इशारा

Ashti Assembly Constituency: जर तिकीट मिळालं नाही, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं म्हणत भाजपचे बीडच्या आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

विनोद जिरे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गुडघ्याला बाशिंग बांधलेले अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावू पाहत आहे. आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदाराचे काम मतदारसंघात कमी आहे. त्यामुळे मी महायुतीचा दावेदार आहे. जर तिकीट मिळालं नाही, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं म्हणत भाजपचे बीडच्या आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

यावेळी भीमराव धोंडे म्हणाले की, आष्टी मतदारसंघात गतवेळी मला एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी मीच उमेदवारीचा दावेदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारांना मतदारसंघात प्रतिसाद कमी आहे. अशा स्थितीत आम्ही गप्प बसलो तर महाविकास आघाडीला याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही मतदारसंघात संपर्क दौरे करत आहोत. विद्यमान आमदारांनी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काही जमले नाही, असं भीमराव धोंडे यांनी महायुतीच्या घटक पक्षाला दिला आहे.

दरम्यान, भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे मतदारसंघात दौरे करत असून भाजपाकडून उमेदवारीचा दावा देखील त्यांनी केला आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्यास कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ, असे म्हणत धोंडे यांनी एक प्रकारे अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धारच केल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT