पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. पिंपरी विधानसभा मतदारसंघावर सध्या महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. पिंपरी मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये २०१४ मध्ये शिवसेनेची सत्ता होती. पण २०१९ मध्ये अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता.
पिंपरी विधानसभा मतदारसंघावर २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. या मतदारसंघामध्ये तेव्हा अण्णा बनसोडे हेच आमदार होते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी अण्णा बनसोडे यांचा पराभव केला आणि या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकावला. पण २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे आणण्यात यश आले. या मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे यांना पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून या मतदारसंघावर विजय मिळवला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा सध्या अजित पवार गटाकडे आहे. या मतदारसंघाचे विधानसभेच प्रतिनिधित्व आमदार अण्णा बनसोडे हे करत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. त्यावेळी अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या पराभव केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अण्णा बनसोडे हे अजित पवार गटासोबत गेले. सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पिंपरी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे दोन्ही गट दावा करत आहेत. शिवसेनेत देखील दोन गट आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट देखील दावा करण्याची शक्यता आहे. आणि आरपीआय आठवले गटाकडून देखील महायुती पिंपरी विधानसभा क्षेत्रावर दावा करण्याची शक्यता आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे ८६,९८५ मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला होता. त्यांना ६७, १७७ मतं मिळाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांना साथ दिली. हा मतदारसंघ सध्या अजित पवार गटाच्या ताब्यात आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यात लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये तेव्हा शिवसेनेला विजय मिळवण्यात यश आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार हे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे यांचा पराभव केला होता. गौतम चाबुकस्वार यांवा ५१,०९६ मतं मिळाली होती. तर अण्णा बनसोडे यांना ४८,७६१ इतकी मतं मिळाली होती.
पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि भाजपचे उमेदवार अमर शंकर साहेब यांच्यात लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे यांनी ६१,०६१ मत मिळवत विजयी झाले होते. त्यांनी अमर शंकर साहेब यांचा पराभव केला. अमर शंकर साहेब यांना ५१,५३४ मतं मिळाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.