आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल- नवाब मलिक
आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल- नवाब मलिक Saam TV
महाराष्ट्र

आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल- नवाब मलिक

विनोद जिरे

बीड : आज ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर, या निवडणुका घ्याव्या लागत आहे. केंद्रातील भाजपने इम्पेरिकल डाटा दिला असता तर हे आरक्षण मिळालं असतं, मात्र केंद्रातील भाजप सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी, मराठा यासह सर्वच आरक्षण रद्द करण्याचा घाट घालत आहे. आरक्षण मुक्त भारत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

आरक्षण (OBC Reservation) याचिकाबाबत लढणाऱ्या वकिलांची भाजप (BJP) फिस देत आहे. मात्र आज निवडणुका झाल्या तर देशातून भाजप हद्दपार होईल. मी वाट पाहतोय पाहुणे कधी येतायत, चहा बिस्कुट तयार आहे. असं म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी, अमित शहांसह भाजपवर आरोप करत सडकून निशाणा साधला आहे. तर वसोलो पर आ जाय तो टकराणा चाहीये, जिंदा है दिखाना चाहीये. असं म्हणत नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शायरांना अनोख्या अंदाजामध्ये भाजपला आव्हान दिलं आहे.

ते पुढे म्हणाले, की महाराष्ट्रात एक वेगळी परस्थिती निर्माण झाली आहे. काही नेते स्वतःला राजकीय चाणक्य समजत होते, मात्र पवार साहेबांनी शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी केली. आमच्या चाणक्याने सगळ्यांना मात देऊन हे सरकार आणलं. महाराष्ट्रात कोविड सारखी परस्थिती निर्माण झाली. मात्र याला जबाबदार कोण ? हा प्रश्न कोणी बोलत नाही. आमची मागणी होती परदेशातील विमान बंद करा, मात्र केंद्रातील हर्षवर्धन नावाचे मंत्री म्हणाले देशात कोरोना येणार नाही. चीन युरोप मधील कोरोनाला केंद्र सरकारने नमस्ते ट्रम्पच्या भानगडीत भारतात आणला. त्यामुळे हजारो लोकांचे बळी गेले. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये जास्त लोक उपचाराविना मेले, महाराष्ट्रात अशी परिस्थिती होवू दिली नाही. महाराष्ट्रात एकाही रुग्णांचा ऑक्सीजनविना मृत्यू नाही. महाराष्ट्रात 2 लाख पर्यंत कर्जमाफी केली. आणखीन उरलेले 50 हजार देखील लवकरचं होईल.

अमित शहा म्हणाले निवडणुकी घ्या, मग पाहू. अमित शहा साहेब अगोदर मोदी साहेबांनी राजीनामा दिला, तर आमची पण राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायची तयारी आहे. आता जर देशात निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्द पार होईल. आष्टीत फर्जीवाडा आहे, कारवाई तर होणार, बकरे की मां कबतक खैर मनायेगी. मी तर वाट पाहतो, कधी पाहुणे येणार, चहा बिस्कुट तयार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतायत काही करा रेड करा. अहो देवेंद्रजी पवार साहेबांच्या घरी पाहुणे पाठवले. मात्र आमचं सरकार आलं. ही चोरोकी बारात म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि किरीट सोमय्या म्हणजे त्यामधील बाराती आहेत.

ओबीसीच्या जागेवर आज निवडणूक होत नाही, केंद्रातील भाजप सरकार आरक्षण मुक्त भारत करू पहातंय. हे भाजप कुणाचं आहे ? हे तुम्हाला माहितेय. मंडल आयोगाला विरोध करायचं काम भाजपनं केलं होतं. जे लोक ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात जात आहेत. त्यांना भाजपचे पाठबळ आहे. एका एका वकिलांची फिस 10-10 लाख रुपये आहे, त्यांना भाजप फिस देत आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून इथल्या लोकांचे आरक्षण रद्द करण्याचा डाव भाजप करत आहे.

काही लोक म्हणत होते ही सभा कशी होते, मात्र मी त्यांना सांगतोय आम्ही कायद्याने अन परवानगी घेऊन सभा घेतोय, बेकायदेशीर आम्ही काही करत नाहीत. आमच्या या तिन्ही पक्षाच्या 17 उमेदवारांना निवडून द्या. वसोलो पर आ जाय तो टकराणा चाहीये, जिंदा है दिखाना चाहीये. असं म्हणत यावेळी नवाब मलिक यांनी भाजपसह स्थानिक आमदार धसांना इशारा दिला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT