sangli, ajit pawar, idris naikwadi saam tv
महाराष्ट्र

NCP Crisis Highlights: राष्ट्रवादीची तिसरी पिढी म्हणते, 'अजित पवार शब्द पाळणारा नेता, शरद पवारांनी...'

विजय पाटील

Sangli News : मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या सोबत बॅनर झळकले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे नेतृत्व डावलून अजित पवार यांचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे माजी महापौर इद्रिस नायकवडी (idris naikwadi) यांना राष्ट्रवादीचा (ncp) दूसरा गट टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली आहे. (Maharashtra News)

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बंडखोरी (NCP Ajit Pawar Politics) करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये शामील झाल्यानंतर मिरजेचे राजकारण ढवळून निघाले आहे. स्वर्गीय इलियास भाई नायकवडी यांचे सुपुत्र माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी शरद पवार यांचे नेतृत्व डावलून अजित पवार यांचा झेंडा हाती घेतला आहे.

स्वर्गीय इलियास भाई नायकवाडी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. शरद पवार यांनी स्वर्गीय इलियास भाई नायकवडी यांना शेवट पर्यंत न्याय दिला नसल्याने माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी अजित पवार (Ajit pawar rebel) यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे सांगितले.

माजी महापौर इद्रिस नायकवडी आणि त्याचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवडी हे सांगली महापालिका राजकारणाच्या माध्यमातून स्वर्गीय इलियास भाई नायकवडी यांची तिसरी पिढी आज राष्ट्रवादी पक्षात सक्रिय आहे.

सांगली (sangli) महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यावर नाराजी आणि दिलेला शब्द पाळला जात नाही. त्याउलट अजित पवार हे दिलेला शब्द पाळल्या शिवाय राहत नाहीत. स्वर्गिय इलियास भाई नायकवडी यांचा शब्द पाळला असून अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT