Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe statement On Politics Entry saam tv
महाराष्ट्र

IAS तुकाराम मुढेंना राजकारणात यायचंय? FDAच्या आयुक्तांनीच दिलं उत्तर

IAS Tukaram Mundhe : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाची सर्वत्र चर्चा सुरू असताना त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र FDA आयुक्तांनी यावर काय उत्तर दिलं? जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचा राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.

  • FDA आयुक्त म्हणून त्यांच्या कामाची नागरिकांमध्ये चर्चा होतेय.

  • तुकाराम मुंढे राजकारणात आले तर? या चर्चेला आता वेग आला आहे.

महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुढेंच्या कामाचा धडाका पाहून सामन्य नागरिकांसह नेतेमंडळीही त्यांच्यावर प्रभावित झालेत. सोशल मीडिया असो की शासकीय कार्यकर्म सर्वत्र आयएएस अधिकारी तुकाराम मुढेंचीच चर्चा आहे. इतकेच नाही मुक्ताईनगरमधील एका गावातील ग्रामपंचायतीनं तुकाराम मुढेंचा घरोघरी फोटो ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कोणत्याच दबावाला बळी न पडता आपलं कर्तव्य करणारा अधिकारी जर राजकारणात आला तर? असाच प्रश्न आता तुकाराम मुढेंबाबत केला जातोय.

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पदाचा संभाळल्यापासून तुकाराम मुंढे सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहेत. मुढेंनी धाडी टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक रेस्टॉरंट्स आणि 'क्विक-डिलिव्हरी' प्लॅटफॉर्म केंद्रांचे परवाने रद्द केलेत. त्यांच्या कामांच्या धडाक्यामुळे मुंढे सतत प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावरही त्यांची चर्चा आहे, सोशल मीडियावरील काही लोक देशाला अशा अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांचीही अधिक गरज असल्याचं म्हणत आहेत. यातून एक प्रश्न निर्माण होतो: तुकाराम मुंढे राजकारणात प्रवेश करतील का? त्यांनी स्वतःच याचे उत्तर दिलंय.

एनडीटीव्ही प्रॉफीटच्या एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुढेंनी त्याच्या राजकारणातील पदार्पणाबाबत भाष्य केलंय. तुकराम मुढेंना राजकारणात यायचंय का प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, त्यांचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. हे क्षेत्र त्यांच्या स्वभावाला साजेसे नाही. "माझ्यासारखी व्यक्त, जी अत्यंत स्पष्टपणे बोलते. मला नाही वाटत की ती राजकारणात स्वतःला प्रस्थापित करू शकेल."

मुंढे पुढे म्हणाले की, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लोक त्यांना 'अहंकारी' म्हणतात. "अहंकारी असणे आणि आपले मत स्पष्टपणे मांडणे यांत खूप पुसटशी रेषा असते. यातही काही वेगळे नाही, मी केवळ अशाच प्रकारे वागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची केली पाहणी

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT