TUKARAM MUNDHE’S FDA CRACKDOWN REACHES SHEGAON AFTER SHIRDI PRASAD RAIDS saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा राज्यभरात धडाका; शिर्डीनंतर शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAचा छापा

FDA Raids Shegaon Kachori Centre: अन्न व औषध प्रशासनाने शेगावातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा टाकला आहे. कच्च्या मालाचे आणि खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

Bharat Jadhav

  • शिर्डीनंतर FDA ने शेगावातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा टाकला.

  • कचोरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.

  • तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोहीम सुरू आहे.

संजय जाधव, साम प्रतिनिधी

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यभरात अन्न व प्रशासन विभागाकडून छापेमारी सुरू आहे.बुलढाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने शिर्डीनंतर शेगावमध्ये छापा टाकला. साईबाबांच्या शिर्डीमधील प्रसादाच्या दुकानात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचं समोर आल्यानंतर एफडीएच्या पथकाने शिर्डीत छापेमारी करत अनेक दुकानदारांचा झाडाझडती घेतली. खासगी दुकानदाराकडील पेढा प्रसादाचे नमुने गोळा केली आहेत. आता शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा मारला आहे.

शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटर असलेल्या तीरथराम करमचंद शर्मा या प्रतिष्ठानावर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून या कचोरी सेंटर वरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासनीसाठी घेतले. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शेगाव येथील कचोरी ही प्रसिद्ध आहे व शेगाव येथे आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात.

मात्र ही कचोरी कशी बनवल्या जाते, त्यासाठी कोणता कच्चामाल वापरला जातो? हे तपासण्यासाठी काल सायंकाळी अचानक अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकण्यात आला. या छापेमारीत कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य व त्याचे नमुने घेण्यात आले तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळून आली तर शेगाव कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येईल, असंही अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाने आधी कोल्हापूर आणि पुण्यातील बेकायदेशीर औषध व्यवसायावर छापा टाकला होता. कोल्हापूरमधील मेडिकल फर्मवर छापा, १३.७६ लाखांचे अॅलोपॅथिक औषध जप्त केले. आवश्यक परवाने व कागदपत्रांअभावी औषधसाठ्यांवर कारवाई करण्यात आली. पुण्यात नामांकित औषध कंपनीच्या गोदामातून ११.११ लाखांची शेड्युल -एच औषधे जप्त करण्यात आली. प्रिस्क्रिप्शन औषधांच्या जाहिरातीबाबत नियमभंग आढळल्याने एफडीएनं कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT