Bhaskar Jadhav News Saam TV
महाराष्ट्र

निवडणुका उद्याही होतील, OBC आरक्षणाच्या कायद्याबद्दल मी साशंक; भास्कर जाधवांच वक्तव्य

74 व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य सरकारचा नाही. त्यामुळे निवडणुका केव्हा घायच्या हा पूर्ण निर्णय निवडणूक आयोगाचा आहे राज्य सरकारचा नाही.

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) राज्य सरकारने कायदा केला पण, मी याबाबत साशंक आहे. कारण, निवडणुका घेणे हा 74 व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य सरकारचा नाही. त्यामुळे निवडणुका केव्हा घायच्या हा पूर्ण निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. राज्य सरकारचा नाही. त्यामुळं निवडणुका या चार किंवा सहा महिन्यांनी नाही तर उद्या देखील होतील. असे विधान शिवसेना आमदार भास्कर जाधव (Shivsena MLA Bhaskar Jadhav) यांनी करत एक प्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ते रत्नागिरी जिल्हा (Ratnagiri District) परिषदच्या इमारत विस्तारिकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमवेळी जाधव बोलत होते. त्यावेळी व्यासपीठवर कॅबिनेट मंत्री उदय सामंत देखील हजर होते. त्यामुळे भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावरून त्यांना काय सुचवायचे आहे? अशी चर्चा यावेळी सुरु झाली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हसन मुश्रीफ, अनिल परब, विनायक राऊत ऑनलाईन हजर होते.

दरम्यान नवीन इमारतच्या कामात बेस्टमेंटलाा काय बदल हवेत हे अजूक माहिती ऑनलाईन कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली. तर काम हे पुढील 25 ते 30 वर्षाचा विचार करून झाला पाहिजे. उदय सामंत तुम्ही लक्ष घाला. कामे वेळेत झाली पाहिजेत.कारण इमारत ही शहराच्या सुंदरतेत भर घालत असते अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी केल्या. तसेच भास्कर जाधव यांचा मुलगा आणि जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांचे कौतुक देखील केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT