शिवसेनेने भाजपसोबतच्या मैत्रीचा फेरविचार करावा; माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा सल्ला

भाजपची साथ सोडल्यानंतर पंजाबमध्ये (Punjab) अकाली दलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तशीच अवस्था शिवसेनेची देखील होईल.
Shivsena-BJP
Shivsena-BJPSaam TV

पंढरपूर : पाच राज्यातील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शिवसेनेला डीवचण्याचा प्रय़त्न केला आहे. शिवसेनेने भाजप सोबतच्या युतीचा फेर विचार करावा, अन्यथा सेनेची पंजाबमधील अकाली दला सारखी विचित्र अवस्था होईल असे राजकीय भाकित व्यक्त करत, जुन्या मित्राची साथ सोडू नये यातच सेनेचे राजकीय हित असल्याचा सल्ला देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

हर्षवर्धन पाटील हे भाजपचे (BJP) नेतेअसले तरी त्यांचे ठाकरे कुटुंबीयांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या या सल्ल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यातील निवडणूक निकालाचे राजकीय विश्लेषण करताना शिवसेनेच्या (Shivsena) राजकीय भविष्याविषयी चिंताही व्यक्त केली.

Shivsena-BJP
Election Special : गोवा,यूपी आणि पंजाबमध्ये कोणाची सत्ता,कोणाचे सरकार ?;पाहा सविस्तर चर्चा

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा (Uttar Pradesh, Uttarakhand, Manipur and Goa) या चार राज्यात भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. पंजाबमध्ये आपने मुसंडी मारली आहे. मागील अनेक वर्षे पंजाबमध्ये अकाली दलाने भाजप सोबत निवडणुका लढवल्या. त्यामध्ये अकाली दलाला फायदा झाला. भाजप सोबतच्या युतीमुळे केंद्रातील सत्तेत वाटा मिळाला.

मात्र, भाजपची साथ सोडल्यानंतर पंजाबमध्ये (Punjab) अकाली दलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तशीच अवस्था शिवसेनेची देखील होईल. त्यामुळे शिवसेनेने भाजप सोबतच्या मैत्रीचा फेर विचार करावा. त्यातच त्यांचे राजकीय हित आहे. अन्यथा शिवसेनेची देखील पंजाबमधील अकाली दला सारखी अवस्था होईल असे भाकितही पाटील यांनी वर्तवले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com