satara, forest department, hyenas, dastgir colony saam tv
महाराष्ट्र

Satara News : मध्यवस्तीत घुसलंय 'तरस'; सातारकरांची उडाली तारांबळ

ओंकार कदम

Satara News : सातारा (satara) शहरातील दस्तगीर कॉलनीत एक तरस घुसल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे या तरसाला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची झुबंड उडाली आहे. या तरसाल पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (satara latest marathi news)

सातारा शहरातील दस्तगीर कॉलनी मध्ये एक तरस आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तरस हा वन्य प्राणी आज (शुक्रवार) सकाळी अचानक या भागात फिरताना पहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात हा तरस आला कसा असा प्रश्न लोकांना पडला आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान तरस परिसरातील नागरिकांच्या घरांत घुसत होता. त्यामुळे लोकांना भीतीने घराची दारे बंद करून घेत घरातच थांबणे पसंत केले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे (forest department) अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर वन विभाग आणि स्थानिक (satara) लोकांच्या मदतीने या तरसाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

SCROLL FOR NEXT