Pankaja Munde Jarange Patil Hyderabad Gazette controversy Saam Tv
महाराष्ट्र

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Hyderabad Gazette Controversy Heats Up: दसरा मेळाव्यात गुलामीच्या गॅझेट या टीकेला जरांगेंनी तिखट प्रत्युत्तर दिलंय... मात्र हैदराबाद गॅझेटियरला गुलामीचं गॅझेटियर कोण म्हटलं होतं? आणि त्याला जरांगेंनी काय उत्तर दिलंय?

Omkar Sonawane

ऐकलंत... मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटियरवरुन मराठवाड्यात नवा वाद उफाळून आलाय.. आणि त्याची सुरुवात झाली ती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर... मात्र पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

आपण गुलामीतून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र झालो

लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी स्वतंत्र झालो

लोकशाही स्थापन होण्याआधीचं गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य?

एवढंच नाही तर जातीयवादाचा राक्षस म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंना डिवचलंय.

आधी गुलामीतील गॅझेटियर स्वीकारणं कितपत योग्य? हाच पंकजा मुंडेंचा सवाल आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी जातीयवादावरुन केलेली टीका जरांगेंना चांगलीच झोंबलीय...या टीकेनंतर संतापलेल्या जरांगेंनी पंकजा मुंडेंवर टीका करताना भाषेची मर्यादाच ओलांडलीय.. एवढंच नाही तर पंकजा मुंडेंच्या उमेदवारांनाच नाही तर त्यांची हुजरेगिरी करणाऱ्या मराठा नेत्यांनाही पाडण्याचा इशाराच जरांगेंनी दिलाय..

ऐन दसऱ्याच्या दिवशीच विचारांचं सोनं लुटायचं सोडून आणि पातळी सोडून टीका होत असेल तर सामाजिक म्होरक्या असलेल्या नेत्यांकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा ठेवायच्या... असाच सवाल निर्माण झालाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT