Akola Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime News: तू दिसायला सुंदर नाहीस, तुला कामधंदा येत नाही; दारू पिऊन पतीने केला पत्नीचा छळ

पत्नी दिसायला सुंदर नाही, तिला कामधंदा येत नाही असे म्हणत पती दारू पिऊन पत्नीचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Marathi News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता अकोल्यातून आणखी एक संतापजनक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पत्नी दिसायला सुंदर नाही, तिला कामधंदा येत नाही असे म्हणत पती दारू पिऊन पत्नीचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. पतीच्या याच छळाला कंटाळून पत्नीने अकोल्यातील मूर्तिजापूर शहर पोलिसांकडे तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी (Police) पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुले असून, तिचे लग्न (Marriage) २०१३ मध्ये येळाबारा, ता. वडगाव, जि. यवतमाळ येथील श्यामसुंदर दयाल प्रजापती याच्यासोबत झाले.

लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर पती दररोज घरी दारू पिऊन यायचा. शिवीगाळ करून मारहाण करायचा आणि तू दिसायला सुंदर नाही. तुला कामधंदा येत नाही, असे म्हणत, छळ करायचा. (Maharashtra News)

मुले असल्याने, विवाहिता त्याचा छळ सहन करायची. पती सतत चारित्र्यावर संशय घेतो आणि माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावतो. दुचाकी मागितली असता, विवाहितेच्या वडिलांनी त्याला नवीन दुचाकी घेऊन दिली. त्यानंतरही पती सतत वाद घालून छळ करत होता. वर्षभरापूर्वी पती श्यामसुंदर प्रजापती याने विवाहितेला घरातून हाकलून दिले होते. या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

Rahul Gandhi speech : "अमित शाह यांनीच गोळीबाराचा आदेश दिला," राहुल गांधींचा थेट आरोप; रिजिजू म्हणाले माफी मागा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT