Pune Fraud News: कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणींना घातला तब्बल ४४ लाखांचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

याप्रकरणी पाच आरोपींवर कोथरुड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Kothrud Police Station
Kothrud Police StationSaamtv

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Fraud Latest News: मॉडेलिंग करणार्‍या तरुणीसह इतर तरुणींना कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने पाचजणांनी तब्बल ४४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींवर कोथरुड पोलिस (Kothrud Police Station) ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

Kothrud Police Station
Pune Accident: ह्रदयद्रावक! ट्रकच्या चाकाखाली चिरडून पादचारी तरुणाचा दुर्देवी मृत्यू; चालक अटकेत

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पुणे (Pune) शहरात फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असेच आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून काम देण्याच्या बहाण्याने पाचजणांनी तब्बल ४४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रध्दा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा, जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे व अनिरुध्द बिपीन रासणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी त्यांचे कोथरुड येथील क्लिक अँण्ड ब्रश कंपनीत काम देतो म्हणून इंस्टाग्राम व फेसबुकवर जाहिरात केली. त्याद्वारे दिवसाला पाच ते सात हजार रुपये पैसे देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. सर्व मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर यांचेकडून तीन महिने व दोन वर्षासाठी सबक्रिप्शनचे पैसे आरोपींनी घेतले. (Fraud News)

Kothrud Police Station
11th Admission News: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख ठरली; जाणून घ्या केव्हा होणार सुरूवात

त्यानंतर गुंतवणुकदारांना तात्पुरते काही पैसे देवून त्यानंतर कंपनी अडचणीत असून काम बंद केल्याचे सांगण्यात आले. झालेल्या कामाचे व सबस्क्रिप्शनचे पैसे परत करण्याचे आश्‍वासन आरोपींनी देवून, गुंतवणुकदारांची तात्पुरती समजूत काढून पैसे न देता वेळोवेळी नवीन कारण सांगत दिशाभूल केली.

संबंधित पैसे आरोपींनी संगनमताने, अप्रमाणिकपणे स्वत:चे व्यैक्तिक फायद्यासाठी वापरुन तक्रारदार व इतर साक्षीदारांची एकूण ४४ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com