विनोद जिरे
बीड: "तू मला पसंद नाहीस, मला नाईलाजास्तव तुझ्याशी लग्न करावं लागलं" असं म्हणत तोंडी तलाक दिला. त्यानंतर महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या 19 वर्षीय नवविवाहितेला, पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये (Beed Crime) घडला आहे. ही घटना बीड शहरातील मोमीनपुरा (Moninpura Beed) भागात (ता. 18) दुपारी 12 च्या दरम्यान घडली आहे.
हे देखील पहा-
बीड शहरातील एका (19 वर्षीय) पीडितेचे (ता. 22 ऑक्टोंबर 2019) रोजी लग्न झाले होते. लग्न होऊन महिना झाला नाही, तोच सासरवाडीचे मंडळी पीडितेला वारंवार त्रास द्यायचे आणि यातच हा संतापजनक प्रकार घडला.
नेहमी शारीरिक व मानसिक त्रास;
पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की मला सासरकडील सर्व मंडळी "तू आम्हाला तसं नाहीस, आम्ही नाईलाजास्तव तुझ्याशी लग्न केलं" असं म्हणत नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळून, 17 नोव्हेंबर दिवशी "मी माझ्या आईला फोन करून, मला घेऊन जा" असं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर 18 नोव्हेंबर दिवशी सकाळी 10च्या दरम्यान माझ्या पतीने "तू मला लागत नाहीस" असं म्हणत तीनवेळा तोंडी तलाक म्हणाला व आता मी तुला तलाख दिला आहे तू इथून निघून जा, असं म्हणाला. त्यानंतरही मी घरीच होते, मात्र त्यानंतर दोन तासाने 12 वाजता नवरा, सासू, सासरा, दीर यांनी संगनमताने माझ्या अंगावर पेट्रोल ओतून मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान, माझ्या आईने येऊन आरडाओरड केली व मला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, असं पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. यावरून पिडीतेच्या फिर्यादीवरून पती सरफराज अन्सार मोमीन, सासु जरीना अन्सार मोमीन, सासरा अन्सार मोमीन आणि मोठा दिर शहेबाज अन्सार मोमीन या चौघांविरूद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात Beed Police Station गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात या अगोदरही मुलगा होत नाही म्हणून, चौसाळा येथील एका शिक्षकांने पत्नीला मारहाण करत नांदवण्यास नकार दिला होता. त्यानंतर आष्टीमध्ये वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासूने सुनेला अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. आता या नवविवाहितेला "तू मला पसंत नाहीस, मला तुझ्याशी नाईलाजात्सव लग्न करावं, मला तू लागत नाहीस". असं म्हणत जिवंत पेटवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे पुन्हा एकदा महिला खासदार असणाऱ्या या जिल्ह्यात महिला अन मुलींवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.