अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस Kamala Harris यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला होता. व्हाईट हाऊसने शुक्रवारी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन Joe Biden यांनी काही कालावधीसाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे पदभार दिला होता. जो बायडन आपल्या नियमित आरोग्य तपासणीचा एक भाग म्हणून शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले जाणार होते. त्यामुळे काही वेळासाठी कमला हॅरिस यांनी देशाचं नेतृत्व केलं आहे.
हे देखील पहा-
यादरम्यान, जो बायडन हे आपल्या कोलोनोस्कोपी प्रक्रियेसाठी गेले असताना, त्यांना भूल देण्यात येणार होती यामुळे काही काळ ते बेशुद्धावस्थेत असणार होते. प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, अध्यक्ष बिडेन बेशुद्ध असताना उपराष्ट्रपतींना सत्ता हस्तांतरित करतील.
व्हाईट हाऊसने शुक्रवारी सांगितले की, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे एकूण 1 तास 25 मिनिटे अध्यक्षीय अधिकार होते. व्हाईट हाऊसच्या प्रेस ऑफिसने सांगितले की, सत्तेच्या तात्पुरत्या हस्तांतरणाची घोषणा करणारी अधिकृत पत्रे सकाळी 10:10 वाजता (1510 GMT) पाठवली गेली. तर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सकाळी 11:35 वाजता आपले कामकाज पुन्हा सुरू केलं.
(US Constitution) यूएस संविधानानुसार, राष्ट्रपती काही काळासाठी त्यांच्या कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कोणालाही नियुक्त करू शकतात. सध्या ही जबाबदारी कमला हॅरिस यांच्याकडे देण्यात आली होती. ही बातमी देखील महत्त्वाची आहे कारण अलीकडेच बिडेन आणि हॅरिस या दोघांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.