प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा Saam Tv
महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

मृतकाच्या पत्नीनेच ही माहिती पोलिसांना दिली.

अभिजीत घोरमारे

गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia District) दवणीवाडा पोलीस स्टेशनच्या (Davaniwada Police station) हद्दीत येत असलेल्या बघोली गावात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पत्नी व प्रियकराला दावणीवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिरोडा तालुक्यातील बघोली गावात राहणाऱ्या मूनेश्र्वर पारधी याचा मध्यरात्री खूण झाल्याचे निष्पन्न झाले. मृतकाच्या पत्नीनेच ही माहिती पोलिसांना दिली.

दवणीवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, मात्र एकाच खोलीत पती पत्नी झोपले असताना पत्नीला काहीच माहिती नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला व त्या आधारे पोलिसांनी उलट तपासणी केली असता महिलेनेच पतीचा काटा काढण्यासाठी आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या आधारे पोलिसांनी पत्नी व घराशेजारी असलेल्या कुणाल पटले या दोघांना ताब्यात घेतले असून नेमका खून कुठल्या कारणाने केला त्याचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २५००० वरुन थेट ७१५०० रुपये, आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार?

ChatGPT Go Plan: ₹4,788 किमतीचा ChatGPT Go प्लॅन आता पूर्णपणे मोफत, सबस्क्रिप्शन कसे क्लेम कराल?

Mumbai: मुंबईत मतदार यादीत अद्भुत किमया, एकाच घरात ६ आडनावं असलेल्या व्यक्ती; मनसेने सत्य आणलं समोर

Trikadasha Yog: 3 नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; गुरू आणि शुक्र बनवणार त्रिएकादश योग

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

SCROLL FOR NEXT