Nagpur Husband Wife Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime: संशयाचं भूत मानगुटीवर, पत्नीसह मुलाची हत्या करत पतीने संपवलं जीवन; नागपुरातील भयानक घटना

Nagpur Crime News: चारित्र्यावरील संशयातून एका तरुणाने पत्नीसह ३ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली.

Satish Daud

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

Nagpur Husband Wife Crime News

चारित्र्यावरील संशयातून एका तरुणाने आपल्या पत्नीची हातोडीने ठेचून हत्या केली. त्यानंतर ३ वर्षीय चिमुकल्याला विष देऊन मारलं. इतक्यावरच न थांबता त्याने स्वत: ही गळफास घेऊन आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नागपूरच्या वानाडोंगरी परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. (Breaking Marathi News)

नाजनीन राऊत (वय २५), युग राऊत (वय ३) आणि सचिन राऊत (वय ३८, ईसासनी, भीमनगर, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, सचिन राऊत हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. त्याने पहिल्या पत्नीला सोडून नाजनीन हिच्यासोबत संसार थाटला होता.

दरम्यान, काही दिवसांच्या सुखी संसारानंतर सचिनची पहिली पत्नी रुक्मिणी, नाजनीन आणि सचिनमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे नाजनीनने मुलगा युगसोबत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान तिची एका युवकाशी मैत्री झाली.  (Latest Marathi News)

त्यांच्या मैत्रीची कुणकुण सचिनला लागली. त्यामुळे त्याने चारित्र्यावर संशय घेऊन नाजनीनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघांमधील संबंध आणखीच ताणले गेले. दरम्यान, सचिनने नाजनीला संपवण्याचा प्लान आखला.

त्याने गोड बोलून तिला एका हॉटेलात नेले. तिथेच सचिनने नाजनीनच्या डोक्यावर हातोडीने सपासप वार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने पोटच्या ३ वर्षीय चिमुकल्याला देखील विष देऊन मारले. इतक्यावरच न थांबता सचिनने स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, हॉटेलमधील वेटर ऑर्डर घेण्यासाठी रुमजवळ गेला असता, त्याला खिडकीतून सचिन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने मालकाला माहिती दिली. एमआयडीसी पोलीस आणि आयुक्तांसह उपायुक्त अनुराग जैन, सहायक आयुक्त गुरव घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

Wednesday Horoscope: कौतुक होणार; ५ राशींच्या व्यक्तींच्या पैशांच्या समस्या सुटणार, वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT