Aurangabad Crime News नवनीत तापडिया
महाराष्ट्र

Aurangabad Crime: "साहेब रोजची कटकट एकदाची संपवली"; पत्नीच्या हत्येनंतर पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

Aurangabad Crime News: सुनीता कडूबा हजारे असे मृत महिलेचे नाव आहे. तर, कडूबा भागाजी हजारे असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

वृत्तसंस्था

नवनीत तापडिया, औरंगाबाद

Aurangabad Crime News: औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर हा आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. "साहेब रोजची कटकट एकदाची संपवली" असं तो पोलिसांना शरण जाताना म्हणाला. (Aurangabad Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना औरंगाबादेमधील (Aurangabad) आपतगाव इथली आहे. आपल्या पत्नीचं कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसोबत जमत नसल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. हत्या (Crime) केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस ठाण्यात येऊन त्याने साहेब, "रोजची कटकट एकदाची संपवली" असं म्हणत पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.

सुनीता कडूबा हजारे असे मृत महिलेचे नाव आहे. तर, कडूबा भागाजी हजारे असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. मात्र सुनिता यांच्या हत्येप्रकरणी अजून नातेवाईकांकडून कोणतेही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर देखील तक्रार आली नाही तर पोलिसांतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

SCROLL FOR NEXT