Mumbai: कोश्यारींचा फोटो लावलेल्या खोक्यांचं समुद्रात विसर्जन; ठाकरे गटाकडून राज्यपालांविरोधात अनोखं आंदोलन

Bhagat Singh Koshyari Box News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारींचा निषेध करण्यासाठी अनोखं आंदोलन केलं आहे.
Bhagat Singh Koshyari Box News
Bhagat Singh Koshyari Box Newsसुशांत सावंत

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारींचा निषेध करण्यासाठी अनोखं आंदोलन केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून खोक्यांवर कोश्यारींचा फोटो लावलेले खोके समुद्रात विसर्जित करण्यात आलं आहे. या अनोख्या आंदोलनाने ठाकरे गटाने राज्यपालांचा विरोध केला आहे. (Mumbai Politics News)

Bhagat Singh Koshyari Box News
Nashik News: कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं; अवघ्या 20 दिवसांत कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरले, लासलगावात कांदा लिलाव बंद

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील (Mumbai) गिरगावच्या समुद्रकिनारी हे आंदोलन केलं आहे. यावेळी त्यांनी खोक्यांवर राज्यपालांचे (Bhagat Singh Koshyari) फोटो लावले आणि त्यांच्याविरोधात घोषणा लिहीलेले हे खोके समुद्रात विसर्जित केले. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

ठाकरे गटाच्या वतीने गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.

राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

अंबादास दानवे यांनी यावेळी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले, राज्यपाल बेजबाबदार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या बदनामी करत आहेत. याला आता भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची साथ लाभली आहे. शिवरायांसाठी अश्या हजारो अटका झाल्या तरी आम्ही घाबरणार नाही. राज्यातील शिंदे-भाजप सरकारने राजीनामा दिला पाहिजे! असं दानवे म्हणाले आहेत.

Bhagat Singh Koshyari Box News
Pune Crime: सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री; सिंहगड पोलिसांकडून दोघांना अटक

काय म्हणाले होते राज्यपाल?

तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com