jalna crime news saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! पत्नी मोबाईलवर बोलते, पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या

जालन्यातील परतुर शहरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

लक्ष्मण सोळुंके

जालना : परतुर शहरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पत्नी मोबाईलवर बोलते याचा संशय घेऊन पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केली. ही घटना परतुर शहरातील सावता नगर भागात घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती रक्ताने माखलेल्या अवस्थेत परतुर पोलीस (Police) ठाण्यात हजर झाला. मिलिंद नारायण पाडेवार असं आरोपीचं नाव आहे. आरोपी पाडेवार याच्या कबुली जबाबानंतर परतुर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीय. (husband killed wife attacking with an ax)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिलिंद त्याची पत्नी प्रतिक्षावर नेहमी संशय घेत होता. आज प्रतिक्षा मोबाईल फोनवर बोलत असताना त्याचवेळी तिचा पती मिलिंद घरी पोहोचला. त्यानंतर त्याला संशय आल्याने त्याने रागाच्या भरात प्रतिक्षाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.

प्रतिक्षा गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच परतुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रतिक्षाचा मृतदेह परतुर ग्रामिण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितने नेसली 1,65,200 रुपयांची साडी

SCROLL FOR NEXT