Crime News Saam tv
महाराष्ट्र

Husband Killed Wife and Mother in Law : दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरलं! पतीने पत्नी आणि सासूला क्रूरपणे संपवले

Ahmednagar Crime News : राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News : कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये ही घटना घडली आहे. पत्नी नूतन सागर साबळे वय २३ वर्षे, तर सासू सुरेखा दिलीप दांगट वय ४५ वर्षे अशी मयतांची नावे आहेत.

राहुरी तालुक्यातील कात्रड गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी पहारीने वार करून त्यांची हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. (Maharashtra News)

घटनेनंतर आरोपी सागर फरार झाला आहे. सकाळी दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या भावाने पाहिल्यानंतर घटनेची माहिती राहुरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. (Crime News)

उप विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

SCROLL FOR NEXT