Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News : घरात एकटीच होती महिला; अचानक दीर आला अन्.., धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं!

Nashik Crime News : घरात वहिनीला एकटं स्वयंपाक करताना पाहून दीराची नियत फिरली.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे, साम टिव्ही

Nashik Crime News : घरात वहिनीला एकटं स्वयंपाक करताना पाहून दीराची नियत फिरली. आजूबाजूला कुणी नसल्याची पाहून त्याने जवळ असलेली कुऱ्हाड उचलली. काही कळण्याच्या आतच त्याने वहिनीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत वहिनीचा जागीच मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील बिवळ गावात घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

या घटनेनंतर आरोपी दीर हा फरार झाला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी  (Crime News) दीराचा शोध सुरू आहे. यशोदा लक्ष्मण गावंडे (वय २६) असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. यशोदाला दोन महिन्याचे अपत्य आहे. तर चंदर गावंडे असं फरार झालेल्या संशयित दीराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास यशोदा ही घरात एकटीच होती. ती स्वयंपाक करत असताना अचानक तिचा चुलत दीर चंदर गावंडे हा घरी आला. घरात कुणी नसल्याचं पाहून चंदर याने यशोदाच्या (Nashik News) डोक्यावर, मानेवर मागील बाजूस कुऱ्हाडीचे सपासप चार वार, घाव घालत निघृण खून केली. चुलीजवळ रक्ताचा सडा पडला होता.

कुऱ्हाडीचे वर्मी घाव इतके खोलवर होते की, मेंदूला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या पुर्णपणे तुटल्याने रक्त शरीरातून निघून गेल्याने जागेवरच मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कु-हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. विवाहितेस एक दोन महिन्याचे अपत्य आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही संशयित आरोपी फरार झाला असून पोलीस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT