Accident News Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News : विठ्ठल भेटीची इच्छा अपूर्ण राहिली; दर्शनासाठी निघालेल्या पती-पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू

पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळ आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटरसायकलमध्ये अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

>> भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पती-पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातात विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या पती-पत्नाची जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना सातारा जिल्ह्यातील पती-पत्नीवर काळाने घाला घातला आहे. पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळ आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेनवडी येथील प्रकाश दादा भुजबळ व लक्ष्मी प्रकाश भुजबळ या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचे दोन तुकडे झाले आहेत‌.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी‌ उपचासाठी भुजबळ दाम्पत्याला रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'सकाळ मॅरेथॉन'च्या दुसऱ्या पर्वात धावले हजारो सोलापूरकर

Coffee Side Effects : नाश्ता करण्याआधी कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की धोक्याचे? जाणून घ्या सत्य

१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

Maharashtra Poltitics: काँग्रेसला चीनकडून पैसा मिळतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT