Jalgaon Breaking: जळगावातील एका फॅक्टरीत भीषण स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Breaking: जळगावातील एका फॅक्टरीत भीषण स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामधील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन २ कामगार ठार झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामधील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन २ कामगार ठार झाले आहेत. ही घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये काशिनाथ सुरवाडे (रा. खेडी रोड, जळगाव (Jalgaon)) खेमसिंग पटेल (रा. बेमतेरा, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. घटनास्थळी नशिराबादसह भुसावळ पोलिसांनी लगेचच धाव घेतली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलॉयज् नावाची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या फॅक्टरीत आज दुपारी एका ऑईलच्या टाकीला २ मजूर वेल्डींग करत होते. त्यावेळी अचानक स्पार्किंग होऊन मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये काशिनाथ व खेमसिंग हे २ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात मोठा आवाज झाल्यामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हासनगरमधील जसलोक हायस्कूलजवळील घराची भिंत कोसळली

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दारूच्या नशेत महिलांनी घातला राडा, मुंबई-पुणे हायवेवर तुफान हाणामारी | VIDEO

Breaking : मोठी बातमी! यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यामध्ये बुडून ४ मुलांचा मृत्यू

मुंबई, ठाण्यासाठी पुढील ७ तास अत्यंत महत्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता | VIDEO

SCROLL FOR NEXT