HSC Result 2025 Saam Tv
महाराष्ट्र

HSC Result 2025: बारावीचा निकाल जाहीर! कोकणने परंपरा राखली तर लातूर तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

12th Result 2025 Declared: आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. यावर्षीही कोकण विभागाने बाजी मारली आहे.

Siddhi Hande

आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात बारावीच्या परीक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली आहे हे जाहीर करण्यात आले आहे. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. कोकण (Kokan HSC Result) विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागाने बाजी मारली होती.

नऊ विभागीय मंडळाचा निकाल (HSC Result District Wise)

पुणे ९१.३२

नागपूर ९०.५२

छत्रपती संभाजीनगर ९२.२४

मुंबई ९२.९३

कोल्हापूर ९३.६४

अमरावती ९१.४३

नाशिक ९१.३१

लातूर ८९.४६

कोकण ९६.७४

कोकण विभाग सर्वात अधिक, तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोकण विभाग दहावी-बारावीच्या परीक्षेच बाजी मारत आहे. यावर्षीही कोकणाने ही परंपरा कायम ठेवली आहे. तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.मुलांपेक्षाही मुलींचा निकाल जास्त चांगला लागला आहे.

कोणत्या शाखेची किती टक्केवारी?

विज्ञान- ९७.३५

कला- ८०.५२

वाणिज्य- ९२.६८

व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३

आयटीआय- ८२.०३

HSC Result

बारावीची परीक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. बारावीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्यात पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवू शकतो. त्यामुळे या परीक्षेत चांगले गुण मिळवणे खूप महत्त्वाचे असते. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT