HSC Exam : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. २१ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू असणार आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. ३१९५ मुख्य केंद्रावर बारावीची परीक्षा पार पडेल. (Latest HSC Exam 2023)
कोरोना महामारीनंतर सर्व सुरुळीत असताना पहिल्यांदाच ऑफलाईन वर्ग घेऊन बारावीची परीक्षा होत आहे. मधल्या दोन वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देता आली नाही.त्यामुळे यंदा ६,६४,४६१ मुली तर ७ लाखांच्या आसपास मुलं परिक्षेला बसले आहेत.
कॉपी मुक्त अभियान
गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांनी घरुनचं परीक्षा दिली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कॅमेरे सुरू असतानाही कॉपी करत परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदा कॉपी मुक्त अभियान सतर्कतेने राबवण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठी पथक केंद्रांवर असणार आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटीची १० मिनिटं वाढवून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची पूर्ण तयारी झाली आहे.
'या' नियमांचे पालन करावे लागणार
प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही.
प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावर झेरॉक्सचे दुकान बंद.
सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडीमध्ये नेताना जी पी एस लावण्यात येणार.
उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा बारावीचं प्रॅक्टिकल पार पडणार.
कुठलेही कॉलेज राहिले असतील तर थेरीनंतर प्रॅक्टिकल देता येणार.
परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत आदेश लागू.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.