Konkan Rain and Sea Coast Saam TV
महाराष्ट्र

Konkan Rain: महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल कशी समजते? समुद्राच्या लाटा आणि फेस याचा काय संबंध?

Things You Should Know About Konkan Rain: मान्सून येण्यापूर्वी लाटांची उंची का वाढते, समुद्र आणि फेणीचा काय संबंध? याबाबत मत्सजीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी साम टीव्हीशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

अमोल कलये

रत्नागिरी: रत्नागिरी कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल देणाऱ्या बदलांना सुरुवात झाली आहे. यामुळे मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी म्हणजे फेस येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मान्सून सक्रिय होण्यासासाठी काही दिवस बाकी आहेत. यामुळे आता लवकरच सर्वांना पाऊस अनुभवयाला मिळणार आहे.

मान्सून कधी येणार यांचे मच्छिमार ठोकताळे बांधत असतात. मान्सून सक्रिय होण्याच्या काही दिवस समुद्र किनारी फेणीचे पाणी दिसते. त्यानुसार, आता समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर फेणी दिसू लागली आहे. तसेच दक्षिणेच्या दिशेने नैऋत्य मोसमी वेगवान वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्याची हवामान खात्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे समुद्रात सुरु झालेल्या बदलानुसार ४ ते ७ जून दरम्यानं मान्सून कोकणात येण्याचा मच्छिमारांचा अंदाज आहे. यावेळेला मान्सून लवकर येण्याची देखील चिन्हे आहेत.

मत्सजीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते काय म्हणाल्या?

मत्सजीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते म्हणाल्या की,'मच्छिमार बांधवांची समजूत अशी आहे की, मान्सूनची जवळ येतो, तेव्हा फेसचा रंग मातकट रंगाचा होतो. त्यावरून मच्छिमार हे आडाखे बांधतात की, पाऊस दहा-पंधरा दिवसात पाऊस येईल'.

'मान्सून येण्यापूर्वी लाटांची उंची वाढते. समुद्रातील खळबळ वाढते. समुद्रातील खाली पाणी वर उसळलं जातं. त्यामुळे समु्द्रातील जीवांना पोषक खाद्य मिळतं. त्यानंतर त्यांच्यात वाढ होते. हे चक्र व्यवस्थित होते. त्यावेळी पावसाळ्यात प्रजनन करणारे मासे हे खारफुटीजवळ अंडी किंवा प्रजननासाठी द्यायला येतात. असे वेगवेगळे बदल पाहायला मिळतात, असे त्या म्हणाल्या.

समुद्र आणि फेणीचा काय संबंध?

'समुद्रातील पाणी घुसळल्याने फेस येतो. पाण्याची घुसळन वाढते, त्यावेळी त्याचा मातकटपणा दिसतो. या गोष्टी आपल्याला पाऊस जवळ आल्याचे संकेत देतो, असेही त्यांनी सांगितले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT