Kunbi Records Found in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Kunbi Certificate: राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर; कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या? वाचा...

Satish Daud

How Many Kunbi Records Found in Maharashtra

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ दिला आहे. यानंतर राज्य सरकारकडून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत संपूर्ण राज्यभरात कुणबींच्या हजारो नोंदी सापडल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७६ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी १८९७ ते १९२९ काळातील असल्याची माहिती आहे. यातील ३ हजारांपेक्षा जास्त नोंदी शहरात सापडल्या आहेत. समितीच्या माध्यमातून कुणबी नोंदी तपासण्याच काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

नाशिक महापालिकेकडूनही शहरात स्वतंत्रपणे कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक कुणबी नोंदी तपासण्यात आल्या आहेत. अजूनही नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे.

दुसरीकडे मराठवाड्यात देखील कुणबी जातीचे दाखले शोधण्याचे काम सुरू आहे, आतापर्यंत १,७४,४५,४३२ कागद तपासण्यात आले आहेत. त्यात १४ हजार ९७६ पुरावे कुणबी जातीचे सापडले आहेत, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यात तब्बल ८ हजार १२६ गावात हे पुरावे सापडले आहेत. सापडलेल्या नोंदीपैकी ९ हजार ७५५ कागदपत्रे तपासून वेबसाईट्सवर ४ हजार २८२ कागदपत्रे अपलोड झाले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या?

  • नाशिक जिल्ह्यात ७६ हजार कुणबी नोंदी सापडल्या.

  • अहमदनगर जिल्ह्यात ५७,६८८ कुणबी नोंदी सापडल्या.

  • जळगाव जिल्ह्यात ४५,७२८ कुणबी नोंदी सापडल्या.

  • धुळे जिल्ह्यात ३१,४५३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

  • पुणे जिल्ह्यात जवळपास २० हजार कुणबी नोंदी सापडल्या.

  • कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजार ५६६ कुणबी नोंदी सापडल्या.

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या.

सध्या अनेक जिल्ह्यात कुणबी नोदी शोधण्याचं काम सुरू आहे. यात आणखी वाढ होऊ शकते. माहिती माहिती प्राप्त होताच ती अपडेट करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT