छोट्या घरांमध्ये दरडग्रस्त कुटुंब राहणार कशी? आमदार भरत गोगावलेंचा सवाल! SaamTV
महाराष्ट्र

छोट्या घरांमध्ये दरडग्रस्त कुटुंब राहणार कशी? आमदार भरत गोगावलेंचा सवाल!

तळीये येथील दरडग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या म्हाडाच्या छोट्या घरांना आमदार भरत गोगावले यांनी विरोध केला आहे. छोट्या घरांमध्ये शेतकऱ्यांचे कुटुंब राहणार कसे असा प्रश्न आमदार भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : तळीयेTaliye येथील दरडग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या म्हाडाच्या MHADA छोट्या घरांना आमदार भरत गोगावलेMLA Bharat Gogavale यांनी विरोध केला आहे. छोट्या घरांमध्ये Small Homes शेतकऱ्यांचे कुटुंब राहणार कसे असा प्रश्न आमदार भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या घरांप्रमाणे छोटे घर नको, गावच्या घराप्रमाणे घर हवे अशी मागणीही त्यांनी केली आहे.How a distressed family will live in small houses

महाडMahad तालुक्यातील तळीये गावातील दरडग्रस्तांना शासनाच्याgoverment म्हाडा विभागाकडून देण्यात येणाऱ्या 300 स्केअर फुटाच्या छोट्या घरांना सत्ताधारी पक्षाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. म्हाडा कडून देण्यात येणाऱ्या छोट्या घरात शेतकरी कुटूंब राहणार कसे असा सवालही गोगावले यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या घराप्रमाणे छोटे घर नको गावाच्या घराप्रमाणे घर द्यावे अशी मागणी शासनाकडे भरत गोगावले यांनी केली आहे.

महाड तालुक्यातील तळीये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळून 86 जणांचा दरडीखाली मृत्यू झाला. दरड दुर्घटनेत कुटूंब उध्वस्त झाली घरे गाढली गेली. शासनाने त्वरित दरदग्रस्तांना म्हाडातर्फे घरे बांधून देणार असल्याचे घोषित करून तयारी सुरू केली. भुज येथील एका कंपनीतर्फे अत्याधुनिक अशी घरे तयार केली जात आहेत. मात्र दरडग्रस्तांना देण्यात येणारी ही घरे छोटी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे कुटूंब राहणार कसे असा सवाल करीत या घरांना महाडचे आमदार भरत गोगावले यांनी विरोध केला आहे.

तळीयेमध्ये शेती करणारे शेतकरी राहत असून त्याची जनावरे आहेत. भात, नाचणी इतर धान्य कापणी केल्यानंतर म्हाडा कडून देण्यात येणाऱ्या घरात ठेवणार कुठे, जनावरे बांधणार कुठे, आई, वडील, भाऊ वहिनी, मुले असे मोठे कुटूंब छोट्या घरात मावणार कशी हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दरदग्रस्तांना मुंबईप्रमाणे छोटी घरे नको तर गावच्या घराप्रमाणे घरे द्या अशी मागणी भरत गोगावले यांनी केली आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT